रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (11:37 IST)

देशात रेकॉर्ड ब्रेक नवीन रुग्णांची नोंद

देशभरात अनलॉक 1.0 अंतर्गत 8 जूनपासून अनेक ठिकाणं जसे हॉटेल, खासगी आणि शासकीय कार्यालय तसेच धार्मिक स्थळं खुली करण्यात आली. देशात लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये ही सूट देण्यात आली असली तरी कोरोनाबाधितांच्या संख्येत मात्र वाढ होतच आहे. 
 
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत भारतात 9987 नवीन रुग्ण आढळून आले तर 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 66 हजार 598 झाला आहे. देशात 1 लाख 29 हजार 971 सक्रीय प्रकरणं आहेत. तर, 7466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 29 हजार 214 रुग्ण निरोगी झाले आहे. 
 
यात दिलासा देणारी बातमी म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट. भारताचा रिकव्हरी रेट 48.46 टक्के असणे दिलासादायक बाब आहे.
 
तरी कोरोनाबाधितांच्या आकड्यात भारत जगातील टॉप-5 देशांमध्ये आला आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन यांच्यानंतर भारताचा क्रमांक आहे. कोरोनाचं क्रेंद ठरलेल्या स्पेन आणि इटलीला भारतानं मागे टाकले आहे.