मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (08:56 IST)

राज्यात कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला असून राज्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या ८८ हजार ५२८च्या घरात पोहोचली असून, सोमवारी  कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
विशेष म्हणजे राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून, १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ९७५ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. 
 
राज्यात १०९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद  झाली आहे. नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३२ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  ३ मे ते ५ जून या कालावधीतील आहेत. ठाणे- ७० (मुंबई ६४, कल्याण-डोंबिवली २, उल्हासनगर १, वसई-विरार १, भिवंडी १, ठाणे १), नाशिक- १३ (नाशिक २, जळगाव ६, धुळे ४, अहमदनगर १), पुणे- १३ (पुणे ७, सोलापूर ६), कोल्हापूर- ३ (रत्नागिरी ३),औरंगाबाद-९ (औरंगाबाद ८, जालना १), लातूर-१ (नांदेड १) या जिल्ह्यांतील रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.