1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (09:22 IST)

राज्यात २४३६ नवे करोना रुग्ण, १३९ जणांचा मृत्यू

2436 new corona patients
महाराष्ट्रात २४३६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १३९ इतकी झाली आहे. तर राज्यात १४७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या ८० हजार २२९ इतकी झाली आहे. राज्यात सध्याच्या घडीला ४२ हजार २१५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ४३.८१ टक्के इतके आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ३.५५ टक्के झाला आहे अशीही माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे.  
 
महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३५ हजार १५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या ५ लाख ४५ हजार ९४७ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. नोंदवण्यात आलेल्या १३९ मृत्यूंपैकी ७५ पुरुष तर ६४ महिल्या होत्या. ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ७८ रुग्ण यामध्ये होते. तर ४० ते ५९ या वयोगटातील ५३ रुग्ण होते. ८ रुग्णांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी होते. १३९ पैकी ११० रुग्णांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग अशा प्रकारचे गंभीर आजार आढळले. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८४९ इतकी झाली आहे.