सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जून 2020 (16:30 IST)

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट रेकॉर्ड केली आहे, प्रियकराला ठरविले आत्महत्येसाठी जवाबदार

सोमवारी कन्नड अभिनेत्री चंदना हिच्या मृत्यूची बातमी उघडकीस आली. त्यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळाचे वातावरण आहे. 29 वर्षीय अभिनेत्रीने विष प्राशणं करून आपले प्राण सोडले. ताज्या बातम्यांनुसार अभिनेत्रीने आरोपित प्रियकर दिनेशला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने स्वतःचे निधन होण्यापूर्वीच सुसाईड नोट रेकॉर्ड केले. यात तिने प्रेमात धोका मिळाल्यामुळे आपले जीव देत आहे. 
 
आतापर्यंत आलेल्या वृत्तानुसार अभिनेत्रीने तिच्या मृत्यूपूर्वी नोंदविलेल्या आपल्या लांबच्या वक्तव्यात कथित प्रियकर दिनेशची बेवफाई सांगितली आहे. दिनेशसोबत गेल्या 5 वर्षांपासून तिचा संबंध असल्याचे तिने  सांगितले आहे. दिनेशबरोबर लग्नाविषयी ती सतत बोलत असे, परंतु त्याने नेहमीच हे प्रकरण टाळले. याच काळात दिनेशने तिचा प्रत्येक प्रकारे वापर केल्याचा आरोप देखील अभिनेत्रीने लावला आहे. याशिवाय तो इतर मुलींशीही प्रेमसंबंधात होता. प्रियकराकडून मिळालेल्या फसवणुकीमुळे ती अभिनेत्री स्वत: चे रक्षण करू शकली नाही आणि तिला मोठा धक्का बसला. म्हणूनच तिने एवढे मोठे पाऊल उचलले आहे.
 
कथित प्रियकर दिनेशविरोधात अभिनेत्रीच्या आई-वडिलांनी पोलिस अहवाल दाखल केल्याचे वृत्त असून पोलिसांनी दिनेशच्या पालकांना आणि कुटुंबियांना ताब्यात घेतल्याची बातमी आहे. याप्रकरणी अद्याप पोलिस कारवाई सुरू आहे. त्याशिवाय दिनेशने अभिनेत्रीला रुग्णालयात नेले होते हेही कळले आहे पण ती मृत असल्याचे समजताच संधी पाहून तो रुग्णालयातून पळून गेला.