मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 24 मार्च 2020 (13:08 IST)

कियाराची पाकिस्तानमध्येही क्रेझ

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची क्रेझ केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार पोहोचली आहे. याच अभिनेत्रींच्या यादीमध्ये आता अभिनेत्री कियारा अडवाणीचा देखील समावेश झाला आहे. कियाराची लोकप्रियता चक्क पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे. काही पाकिस्तानी कलाकारदेखील तिचे चाहते असून एका पाकिस्तानी अभिनेत्रीने तिची स्टाइल कॉपी केल्याचं दिसून येत आहे. मात्र ही स्टाइल कॉपी केल्यामुळे या अभिनेत्रीला चांगलंच ट्रोल व्हावं लागलं आहे.

माहिरा सोशल मीडिावर सक्रिअसून बर्‍याच वेळा ती तिचे फोटो, व्हिडिओज शेअर करत असते. यामध्येच तिने बीचवरील एक फोटो शेअर केला आहे. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर तिने कियारा अडवाणीला कॉपी केल्याचं नेटकरंनी म्हटलं आहे.