शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (12:48 IST)

क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, पुन्हा भिडणार भारत-पाक!

यावर्षी होणाऱ्या आशियाई कप (Asia Cup) चे यजमानपद पाकला देण्यात आले होते, मात्र सुरक्षेच्या कारणावरून भारतासह इतर देशांनी पाकमध्ये सामने खेळण्यास नकार दिला. त्यामुळं यंदाचा आशियाई कप दुबईमध्ये होणार आहे. येथेच भारत-पाक (India vs Pakistan) सामना खेळला जाणार आहे.
 
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने याबाबत माहिती दिली. भारत-पाक (India vs Pakistan) यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. कारण दोन्ही देशांमधील शेवटची मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर पाकिस्तान संघ तीन वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात आला. दोन्ही संघांचा शेवटचा कसोटी सामना 13 वर्षांपूर्वी 2007 मध्ये खेळला गेला होता. त्यामुळं केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये भारत-पाक एकमेकांविरुद्ध भिडतात.
 
आशिया कप ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाने पाकिस्तानला भेट देणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर ही स्पर्धा दुबईला होणार असल्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला. पुढील महिन्यात एशियन क्रिकेट कौन्सिलची बैठक 3 मार्च रोजी दुबई येथे होणार आहे आणि बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी दुबईला जाण्यापूर्वी ईडन गार्डन्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पाकिस्तानने या स्पर्धेचे आयोजन केले तरी बीसीसीआयला कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.