मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 8 जानेवारी 2020 (14:40 IST)

आयपीएलचा रोज एकच सामना?

इंडियन प्रीमिअर लीग 2020 ची सुरुवात 29 मार्च रोजी मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये होणार हे ठरले आहे. तेथेच आयपीएलचा अंतिम सामनाही 24 मे रोजी रंगणार आहे. आयपीएल 57 दिवस चालणार आहे. याचाच अर्थ असा की, कदाचित कोणत्याही दिवशी दोन सामने नसतील. प्रत्येक सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. म्हणजेच आता एका दिवशी आयपीएलचे दोनसामने हा इतिहास होणार आहे. 
 
सूत्रांनी दिलेल माहितीनुसार, सामन्यांसाठी 45 दिवसांपेक्षा अधिक कालावधी मिळेल. त्यामुळे एका दिवशी एकच सामना खेळवणे अडचणीचे होणार नाही.