रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (14:31 IST)

जयललितांसाठी कंगनाला करावे लागले 'हे' काम

बायोपिकच्या ट्रेंडमध्ये अभिनेत्री कंगना राणौत हिची महत्त्वाची भूमिकर असणारा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. राजकीय वर्तुळात दबदबा असणार्‍या जयललिता यांच्या जीवन प्रवासावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट म्हणजे 'थलावी'. या चित्रपटासाठी कंगनाने सुरुवातीपासूनच प्रचंड मेहनत घेतली होती. जयललिता यांच्या 72व्या जयंतीनिमित्त या चित्रपटातील कंगनाचा आणखी एक लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला गेला.
 
यामध्ये पांढर्‍या रंगाची साडी, कपाळावर लाल रंगाची टीकली आणि चेहर्‍यावर एक प्रकारचे स्मितहास्य असे एकंदर तिचे रूप दिसत आहे. कंगनाने जय‍ललिता यांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली ही मेहनत आणि अंतिम रुपी पाहायला मिळालेला तिचा लूक पाहता अनेकांनीच तिची प्रशंसा केली आहे. जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाला बर्‍याच गोष्टींमध्ये बदल करावे लागले. एका मुलाखतीत तिने सांगितल्याप्रमाणे ही भूमिका साकारण्यासाठी तिला हार्मोन पिल्स घ्यावा लागल्या होत्या. कंगना सडपातळ बांधची होती. तिचा चेहराही गोलाकार नव्हता. त्यामुळे या भूमिकेसाठी तिला या पिल्स घ्यावा लागल्या होत्या. शिवाय वजन वाढवण्यासाठी तिने खाण्याच्या सवयींवर ही काम केले होते.