मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (16:29 IST)

न्यूझीलंडला पहिला कोरोनामुक्त देश होण्याचा मान

न्यूझीलंड या देशानं कोरोनाला पूर्णपणे हरवून पहिला कोरोनामुक्त देश होण्याचा मान मिळवला आहे. या देशात सद्यघडीला एकही कोरोनाचा रुग्ण शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे लवकरच न्यूझीलंडमधली सर्व बंधनं हटवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या लसीशिवाय देखील कोरोनाला हरवणं शक्य आहे, हे न्यूझीलंडनं दाखवून दिलं आहे.
 
२५ मार्च रोजी न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये एकूण १४७४ कोरोनाबाधित सापडले. त्यातल्या २२ रुग्णांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे न्यूझीलंड देखील जगातल्या इतर देशांप्रमाणेच कोरोनाच्या विळख्यात सापडतो  अशी भिती निर्माण झाली. मात्र, न्यूझीलंड सरकारने वेळोवेळी घेतलेले कठोर निर्णय, लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी आणि न्यूझीलंडच्या नागरिकांचं जबाबदार वर्तन यामुळे त्यांना कोरोनाला हरवणं शक्य झालं आहे. गेल्या १७ दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये एकही नवा कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. गेल्या १० दिवसांपासून कोरोनाच्या शेवटच्या बाधितावर उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्याचा देखील रिपोर्ट आला असून तो ही निगेटिव्ह आला आहे.