बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (09:41 IST)

खासगी रूग्णालयांवर पाच सनदी अधिकारी नेमणार

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दोन दिवसांपूर्वी खासगी रूग्णालयांना चाप लावण्यासाठी पाच सनदी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला. यावर एक पाऊल पुढे जात मुंबईचे महापालिका आयुक्ता इक्बाल चहल यांनी प्रत्येक खासगी रूग्णालयावर सनदी अधिकाऱ्यांसोबत पालिकेचे दोन ऑडिटर नेमले आहेत.

यामुळे आता राज्यसरकारने आणि मुंबई महापालिकेने नियमित केलेल दर आणि पीपीई किटच्या किंमतीच्या वर जर कोणी रूग्णांकडून जास्त दर आकारले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ज्या रूग्णाच्या नातेवाईकांना आपले बिल राज्यसरकार आणि मुंबई महापालिकेने निश्चित  केलेल्या दरापेक्षा जर कोणी जास्त आकारणी करत असेल तर पालिकेच्या ऑडिटरशी तात्काळ संपर्क साधा असे आवाहन पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आपलं महानगरशी बोलताना केले.