गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्ण

Last Modified गुरूवार, 2 जुलै 2020 (16:09 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात झालेला पाहायला मिळत आहे. या दोन राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४
तासांत गुजरातमध्ये कोरोनाव्हायरस संसर्गाचे सर्वाधिक६७५ रुग्ण आढळले आहेत. आता राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ३३,३१८ वर गेली आहे. याबाबत आरोग्य विभागाने स्पष्ट केले, कोविड-१९ मुळे बुधवारी २१ लोकांचा मृत्यू झाला असून राज्यात मृतांची संख्या १८६९ झाली आहे. या व्यतिरिक्त रुग्णालयातून ३६८ रुग्ण बरे झाले असून ठणठणीत झालेल्या रुग्णांची संख्या २४,०३८ झाली आहे.

बुधवारी अहमदाबादमध्ये संसर्गाची २५१ प्रकरणे पुढे आल्याचे आरोग्य विभागाने निवेदन जारी करताना सांगितले. तर सुरत येथे २०१ रुग्णांची नोंद झाली आहे. सुरतमध्ये पहिल्यांदाच २०० पेक्षा जास्त कोरोना प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अहमदाबादमध्येच कोरोना विषाणू रुग्णांची एकूण संख्या २११२८ तर सुरतमध्ये ५०३० इतकी झाली आहे.

अहमदाबादमध्ये बुधवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने माहिती देताना म्हटले आहे. त्यानंतर एकूण मृतांची संख्या १४४९ वर गेली आहे. तर सुरतमधील कोविड -१९मधील आणखी पाच जणांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या १६३वर पोहोचली. राजकोट, भरुच, अरावली, बनासकांठा, खेडा, अमरेली, दाहोद आणि देवभूमी द्वारका जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या इतर जिल्ह्यांमध्ये बुधवारी नवसारी (२४), जामनगर (१८), भरूच (१५), राजकोट (१५), वलसाड (१५), बनासकांठा (१२), सुरेंद्रनगर (१२) आणि मेहसाणा (१०) यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात सध्या कोरोनाचे ७४११ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६३ रुग्ण व्हेंटिलेटरवर कोरोनाविरूद्ध युद्ध लढा देत आहेत.

गेल्या २४ तासांत कर्नाटकात १२७२ नवीन रुग्ण नोंदले गेले, जे एका दिवसात सर्वाधिक नोंद झाले आहे. कोरोना विषाणू संक्रमणामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्गाच्या नवीन घटनांसह राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या १६,५१४ पर्यंत पोहोचली आणि संसर्गामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या २५३ वर पोचली. बुधवारी नोंदविण्यात आलेल्या१२७२ नवीन प्रकरणांपैकी ७३५ प्रकरणे एकट्या बंगळुरु शहरातील आहेत. राज्यात कोविड -१९ च्या एकूण १६,५१४ घटनांची नोंद झाली असून त्यामध्ये २५३ जणांच्या मृत्यूंचा समावेश आहे, तर ,,८०६३ लोक बरे झाले आहेत.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

बॉश कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून बिटको हॉस्पिटल मध्ये ...

बॉश कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून बिटको हॉस्पिटल मध्ये वाढणार १०० बेड
नाशिकमध्ये कोरोना कक्षांचे ऑडिट नाममात्र शुल्कात करून देण्याची जबाबदारी मे.सिव्हिल ...

राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण

राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना ...

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ...

होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णांनी स्वत:वर या प्रकारे ...

होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णांनी स्वत:वर या प्रकारे घ्यावा उपचार, लवकरच बरे व्हाल
कोरोनावायरसचा उद्रेक पुन्हा देशभरात सुरू असून दररोज लाखोच्या संख्येत लोक याचे शिकार होत ...

राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार - उदय ...

राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार - उदय सामंत
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. सद्यस्थितीत ...