शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जून 2020 (20:43 IST)

पाचवीत ऑनलाईन शिक्षण नकोच, कर्नाटक प्रशासनाचा निर्णय

कोरोनामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण पद्धतीशी ताळमेळ साधण्याच्या प्रयत्नात आहेत, काही अडचणींचा सामनाही करत आहेत त्यांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा निर्णय ठरत आहे. कर्नाटक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता पाचवीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणावरील बंदीचे आदेश दिले. 
 
NIMHANS च्या अहवालानुसार आणि काही पालकांच्या तक्रारीच्या आधारे किंडर गार्डनपासूनच्या या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेत अखेर शिक्षण विभागाकडून तातडीनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला.
 
याव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा निर्णय कर्नाटक प्रशासनाकडून घेण्यात आला. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून विविध स्तरांवर पैसे आकारणाऱ्या अनेक संस्थांनी हे सत्र तातडीनं बंद करावं असेही आदेश सध्या देण्यात आले आहेत. शिवाय २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय संस्थांनी फी वाढ करु नये अशीही विचारणा करण्यात आली आहे.