1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (20:50 IST)

बाबा विश्वनाथांच्या ऑनलाइन पूजेसह रुद्राभिषेक सुरू

वाराणसी येथील बाबा विश्वनाथांच्या काशी विश्वनाथ मंदिर समितीने दूरवरच्या भक्तांसाठी ऑनलाइन पूजेसह रुद्राभिषेक सुरू केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या ऑनलाइन रुद्राभिषेकाचा शुभारंभ केला. यासाठी भारत आणि परदेशात असलेल्या भाविकांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल, त्यानंतर त्यांना ही सुविधा दिली जाणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.
 
वाराणसी दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाराणसीला पोहोचल्यावर त्यांनी सर्वप्रथम बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. मंदिराच्या गाभाऱ्यात सुमारे आठ मिनिटेअसताना त्यांनी सूक्ष्म रुद्राभिषेकही केला.