सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 10 जून 2020 (15:24 IST)

कर्नाटक परिषदेच्या सात जागांसाठी 29 जूनला मतदान

कर्नाटक विधानपरिषदेच्या सात आमदारांची मुदत येत्या 30 जून रोजी संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. 11 जून 2020 रोजी (गुरूवार) निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांसाठी 18 जून (गुरूवार) अर्ज दाखल करण्याची अखेरचा दिवस असेल.
 
उमेदवारांच्या अर्जाची छाननी 19 जून, (शुक्रवार) रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारांना आपले अर्ज 22 जूनर्पंत (सोमवार) मागे घेता येणार आहेत. मतदान 29 जून रोजी (सोमवार) होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे 29 जून रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.