सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2020 (15:27 IST)

विधान परिषद निवडणुक, उद्धव ठाकरे यांचा अर्ज दाखल

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सोपवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. तसंच आदित्य ठाकरेही होते.
 
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे ५ तर भाजपाचे ४ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दोन उमेदवार दिल्याने तिढा निर्माण झाला होता. मात्र तो सुटला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली खरी, मात्र ते विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. 
 
नऊ रिक्त जागांसाठी निवडणूक, कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण?
उद्धव ठाकरे-शिवसेना
नीलम गोऱ्हे-शिवसेना
राजेश राठोड-काँग्रेस
राजकिशोर मोदी-काँग्रेस
रणजितसिंह मोहिते पाटील-भाजपा
गोपीचंद पडळकर-भाजपा
प्रवीण दटके- भाजपा
डॉ. अजित गोपचडे-भाजपा