शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 मे 2020 (17:15 IST)

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर, काँग्रेस पक्षाकडून राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक घोषित करण्यात आली आहे. उद्या म्हणजेच सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

भाजपने जाहीर केलेल्या चारही उमेदवारांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर, शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उद्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील.

काँग्रेसने दोन नावांची घोषणा केल्याने नऊ जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की निवडणुका घ्यावा लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.