शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2020 (20:49 IST)

कोरोनामुळे ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला (९०) यांचं करोना संसर्ग झाल्याने निधन झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली. अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका आठवड्यापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.