1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (08:02 IST)

कर्नाटकात 4.0 तर आणि झारखंडमध्ये 4.7 तीव्रतेसह भूकंपाचे धक्के

4-point
आज सकाळी 06:55 वाजता कर्नाटकच्या हंपी येथे रिश्टर स्केलवर 4.0च्या तीव्रतेसह भूकंपाचे धक्के जाणवले. या व्यतिरिक्त झारखंडमधील जमशेदपूर येथे रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली आहे.
 
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात गेल्या दीड महिन्यांत डझनाहून अधिक लहान भूकंप झाले आहेत. कोरोना संकटाच्या वेळी बहुतेक लोक घरात असताना वारंवार भूकंपाच्या धक्क्याने चिंता निर्माण केली, परंतु भूकंपशास्त्रज्ञांचा असा विश्‍वास आहे की लहान भूकंपांचा मोठा धोका नाही, उलट ते मोठ्या भूकंपांचा धोका कमी करू शकतात. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीचे संचालक बीके बन्सल यांनी अलीकडेच सांगितले की दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतामधून अनेक फॉल्ट लाईन्स जातात. यामध्ये, हालचालींमधून ऊर्जा बाहेर येते तेव्हा भूकंप होतात.