रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बंगळुरू , गुरूवार, 7 मे 2020 (14:36 IST)

कर्नाटक सरकारने जाहीर केले 1,600 कोटी रुपयांचे पॅकेज

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी  कर्नाटक सरकारने 1 हजार 610 कोटी रुपांचे पॅकेज बुधवारी घोषित केले आहे. राज्य सरकारने शेतकरी, लघू, कुटीर आणि मध्य उद्योग, हातमाग कामगार, फुलांची शेती करणारे, धोबी, न्हावी, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसह अन्य घटकांना या पॅकेजअंतर्गत दत देणची घोषणा केली आहे.

या बरोबरच कर्नाटक सरकारने 11 टक्के उत्पादन शुल्कात वृद्धी करण्याचीही घोषणा केली आहे. ही टक्केवारी अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या 6 टक्क्यांच्या वाढी व्यतिरक्ति असणार आहे.