1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 18 एप्रिल 2020 (17:54 IST)

राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजारांची मदत

thackeray government
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. अशा सगळ्या परिस्थिती बांधकाम कामगारांना आर्थिक अडचण सहन करावी लागते आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकी २ हजारांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
 
बांधकाम मजुरांचा हक्काचा पैसा महाराष्ट्र राज्य बांधकाम मजूर मंडळात जमा आहे. जमा असलेली रक्कम ९ हजार कोटींच्या घरात आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून सेसच्या रुपाने ही रक्कम राज्य सरकारकडून घेतली जाते. त्यामुळे आता करोनासारखा संकट काळ समोर आलेला असताना बांधकाम मजुरांच्या खात्यात पैसे जमा केले जावे असा प्रस्ताव राज्याच्या कामगार विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता. त्यानुसार मदतीच्या स्वरुपात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयास मंजुरी दिली आहे.