रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (12:10 IST)

Falster 3 स्मार्टवॉच भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फि‍चर्स

टेक कंपनी Skagen ने आपली विशेष Falster 3 स्मार्टवॉच भारतात लाँच केली आहे. सिंगल बॅटरी चार्ज केल्यानंतर 24 तास ही बॅटरी चालते, असा कंपनीने दावा केला आहे. 
 
यात दमदार बॅटरी, कॉल करण्यासाठी स्पीकर, गुगल असिस्टेंट आणि 1 जीबी रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. या वॉचमध्ये नोटिफिकेशन, हाय रेट ट्रेकिंग, गुगल असिस्टेंट, गूगल पे, गूगल प्ले स्टोअर, जीपीएस, अलार्म, प्ले म्युझीकचे आणि थर्ड पाटी अॅप्स सपोर्ट मिळणार आहे. या वॉचद्वारे कॉल रिसीव्ह करता येतील. 
 
1.3 स्विम प्रूफ ओएलडी डिस्प्ले असून वॉचसोबत यूजर्सला 42 एमएम केस आणि स्ट्रेप्स मिळतील. ही वॉच लेटेस्ट अँड्रॉयड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते.
 
Skagen Falster 3 स्मार्टवॉचची किंमत 21 हजार 995 रुपये एवढी असून युजर्स ही वॉच कंपनीच्या अधिकृत साइट आणि ऑफलाइन स्टोरवरून खरेदी करू शकतात.