रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2020 (16:23 IST)

राज्य सरकार पोलिस परिवाराच्या पाठिशी ठामपणे उभे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता रस्त्यावर ड्युटी करणाऱ्या पोलिसांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यातच कोरोनामुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल असलेले चंद्रकांत पेंदुरकर आणि संदीप सुर्वे यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५० लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचं देखील सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवरून ही माहिती जाहीर केली आहे. ‘राज्य सरकार त्यांच्या परिवाराच्या पाठिशी ठामपणे उभे आहे’, असं देखील अनिल देशमुख यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.