शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: मंगळवार, 14 एप्रिल 2020 (15:45 IST)

गुणकारी आरोग्यदायी मुळा, पोटाच्या तक्रारीं दूर होतात

जेवण्यात आपण सर्व वस्तूंचा समावेश करत असतो. माणसाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असते. आपल्या आहारात प्रथिनं, कॅल्शियम, व्हिटॅमिन, कार्बोजयुक्त पदार्थ, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर, आयरन, अश्या पौष्टिक तत्त्वाची गरज असते. त्यासाठी आपण सकस आहार घेत असतो. आपण आपल्या आहारात काही कच्च्या वस्तू सॅलडच्या रूपात घेतो. सॅलड म्हणून आपण कांदा, टमाटे, गाजर, बीट, काकडी आणि मुळ्याचा वापर करत असतो. आपण तोंडी लावण्यासाठी हे सगळं घेतो. सगळ्या आपापल्यापरीने फायदेशीर असतात. प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे असतात. चला तर मग आज आपण मुळ्याचे काही विशेष गुणधर्म माहीत करून घेऊ या. 
 
तोंडी लावायला मुळा छान वाटतो. मुळा खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. एका मुळामध्ये पौष्टिक तत्त्व भरपूर आढळतात. कॅलरी, फॅट, डायट्री फायबर, प्रथिन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, शर्करा, आणि व्हिटॅमिन सी मिळते. 
शरीरातील घाण बाहेर काढून आपल्या किडनीला चांगले ठेवण्याचे काम मुळाचे असते.
पोट दुखत असल्यास हे रामबाणाचे काम करते. पचन संस्थेमध्ये बिघाड झाल्यास मुळा खाल्ल्याने आराम मिळतो. भूक लागत नाही अश्या वेळेस मुळाच्या रसामध्ये आल्याचा रस आणि लिंबाचा रस टाकून प्यायल्याने भूक वाढते.
मुळा पोटासाठी लाभदायी असतो. मुळाच्या रसाच्या सेवनाने पोटाचे वेगवेगळे आजार दूर होतात. ताजा मुळा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. पोटात जडपणा असल्यास मुळाच्या रसात मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो. पोटाचे आजार दूर होतात.
यकृततंत्राच्या बिघाडामुळे होणारे आजारांपासून मुळ्याचे सेवन केल्याने त्वरित आराम मिळतो. मुळाचे नियमित सेवनाने यकृत(लिव्हर)उत्तमरीत्या कार्य करतं.
कावीळ झाला असल्यास मुळा खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.
उच्चदाबाला म्हणजेच हाय ब्लडप्रेशर असणाऱ्यांना ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी मुळा लाभकारी आहे. ह्यात अँटी हायपरटेन्सिव्ह चे गुणधर्म असतात. तसेच मुळामध्ये पॉटेशियम आढळतं. मुळा शरीरातील मॅसोडियम आणि पॉटेशियमचे स्तराला नियंत्रित ठेवतं जेणे करून ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. 
 
मुळ्याचा आपल्या आहारात समावेश करावा जेणे करून आपल्या आरोग्यावर उत्तम परिणाम होतील परंतू ज्यांना कफाचा आणि वाताचा त्रास असेल त्यांची ह्याला आपल्या आहारात सामील करू नये.