मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 14 एप्रिल 2020 (16:12 IST)

ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील वंचितांच्या साह्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

ग्रँड मराठा फाऊंडेशन (जीएमएफ), या महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बिगरसरकारी संघटनेतर्फे कोविड-19च्या उद्रेकामुळे लागू केलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊनच्या काळात वंचित घटकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. जीएमएफतर्फे राज्यातील मुंबई, ठाणे, नागपूर, अंबरनाथ, वाडा आणि पांढरकवडा या भागांमध्ये ही मोहीम चालवण्यात येत असून त्यामार्फत तांदूळ, गव्हाचे पीठ, तेल, तूर डाळ, साखर, मीठ आणि अन्य मसाल्यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

आपली मते व्यक्त करताना श्री. रोहित शेलाटकर, संस्थापक, ग्रँड मराठा फाऊंडेशन म्हणाले, “समाजातील वंचित घटकांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी त्यांना अधिक उत्तम सुविधा आणि शिक्षण देऊन त्यांची काळजी घेण्यासाठी ग्रँड मराठा फाऊंडेशन कायमच वचनबद्ध आहे. देश करोना विषाणूशी लढा देत असताना आम्ही, ग्रँड मराठा फाऊंडेशनचे सदस्य संकटग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना प्राथमिक जीवनावश्यक वस्तू पुरवत आहोत. या कठीण काळात सर्वांनीच गरजूंना मदत करावी, असे आवाहन आम्ही करत आहोत.”

त्या त्या प्रदेशांतील स्थानिक राजकीय पक्षांच्या पाठबळावर ही वाटप मोहीम चालवण्यात येत असून नागरिकांकडूनही तिला जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. माधवी शेलाटकर महाराष्ट्रातील या उपक्रमाचे नेतृत्व करीत आहेत. राज्य सरकार आणि आपल्या डॉक्टरांनी कोविड 19च्या फैलावाला रोखण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांना साह्य करण्यासाठी जीएमएफने मुख्यमंत्री निधीतही देणगी दिली आहे.

ग्रँड मराठा फाऊंडेशनविषयी:
ग्रँड मराठा फाऊंडेशन शेतकऱ्यांना कर्ज आणि दारिद्र्याचे दुष्टचक्र भेदता यावे आणि अधिक उत्तम जीवनमान मिळवता यावे यासाठी सक्षम करण्याकरिता सर्वंकष शिक्षणाचे पाठबळ पुरवते ज्यात योग्य किंमतनिर्धारण आणि कार्यक्षम पुरवठ्यापासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतच्या विषयांचा समावेश आहे. विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलेल्या ग्रँड मराठा फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिली जाते ज्याद्वारे त्यांना त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देता येते आणि शेतकऱ्यांना व त्यांच्या विधवांना उदरनिर्वाहासाठी शेती व ग्रामीण क्षेत्रात उपक्रमही हाती घेता येतात. फाऊंडेशनने शाळांना कम्प्यूटर भेट देऊन त्या माध्यमातून ई-लर्निंगची ओळख करून देऊन प्रोत्साहनही दिले आहे. कर्जबाजारीपणा आणि दारिद्र्य यांचे दुष्टचक्र भेदून शेतकऱ्यांसाठी अधिक उत्तम जीवनमान निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्वंकष उपाययोजना देण्याचा ग्रँड मराठा फाऊंडेशनचा उद्देश आहे. हे फाऊंडेशन महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर भागांमध्ये कार्यरत असून शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा सर्वंकष विकास घडवून आणत आहे. शेतकऱ्यांना ज्यांचा सामना करावा लागतो त्या समस्यांचे प्रमाण घटवून त्यांना अधिक चांगले आयुष्य जगण्यासाठी सक्षम करणे, भविष्यासाठी तयार करणे, हा आमचा उद्देष आहे.
लिंकhttp://grandmaratha.org/