1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
  4. Maharashtra Minister Jitendra Awhad goes in self quarantine

एनसीपी नेते जितेंद्र आव्हाड होम क्वारंटाइन

self quarantine
करोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासहित अनेक पोलीस अधिकारी आणि एका पत्रकारालाही क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे.
 
माहितीनुसार मुंब्रा येथे कार्यरत असणारा एका पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. जितेंद्र आव्हाडदेखील या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. यामुळे त्यांनाही होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे.
 
त्या पोलीस अधिकार्‍याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये अनेक मोठे पोलीस अधिकार्‍यांचा तसेच एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचाही समावेश आहे. 
पुढील लेख
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी केल्यास सात वर्षांपर्यंत कैद- छगन भुजबळ