सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (11:45 IST)

पत्नीच्या वर्षश्राद्धाचा खर्च टाळून करोनाग्रस्तांसाठी 1 लाख 11 हजारांचा निधी

पुण्यात माणुसकीचं अनोखं दर्शन घडलं जेव्हा एक व्यक्तीने पत्नीचे वर्षश्राद्ध टाळून एक लाख ११ हजार १११ रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द केला. पुण्यातील सहकारनगरमधील नंदकुमार खैरे यांनी करोनाग्रस्तांसाठी ही मदत दिली आहे. 
 
नंदकुमार खैरे यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी सहकारनगरमधील एक कार्यालय आरक्षित केले होते.  या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचे विधी तसेच एक हजार जणांना भोजन देण्यात येणार होत. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा झाल्यामुळे हा विधी होणार नाही. मात्र खैरे यांनी पत्नीच्या पुण्यस्मरणानिमित्त होणारा खर्च करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबानेही साथ दिली. 
तसेच पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त करण्यात येणारे विधी पुरोहितांच्या सूचनेनुसार घरीच ऑनलाइन पद्धतीने केले.