गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात आज एकाच दिवसांत 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. त्यात एकट्या पुणे शहरात कोरोनाचे 37 रुग्ण सापडले आहे. तर एक रुग्ण बारामतीमधील आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 142 वर जाऊन पोहचली आहे.
 
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे.