पुणे विभागात मागील 24 तासात रुग्णांची संख्या 84 : डॉ. दीपक म्हैसेकर
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सातारा याठिकाणी मागील 24 तासात करोनाचे बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे विभागात आतापर्यंत बाधित रूग्णांची संख्या 84 वर पोहचली आहे. यामध्ये पुणे शहर 42, पिंपरी चिंचवड 14, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापुरातील 2 बाधित रूग्णाचा समावेश आहे.
आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 1 हजार 839 होते. त्यापैकी 1 हजार 663 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 176चे अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 544 नमुने निगेटीव्ह आहेत व 84 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 18 रुग्ण बरे झाल्यामूळे त्यांना रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे.