गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 28 मार्च 2020 (16:04 IST)

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १५९ वर

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊन अधिकाधिक जणांना याची लागण होत असल्याचे समोर येत आहे. नागपूरात देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. इथे आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. दिल्लीला कामानिमित्त गेलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानं हा संसर्ग झाला आहे. 
 
दिल्लीला कामानिमित्त गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १८ व्यक्तींची  तपासणी केली होती. यामध्ये यातील १७ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 
नागपूरात आता कोरोना रुग्णांची संख्या १० झाली आहे. 
 
राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे नवे ५ रुग्ण आढळ्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ६० वर पोहचली आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्येही १ नवा कोरोना रुग्ण आढळला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १५९ झाली आहे.
 
मुंबईत आतापर्यंत ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.