बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2020 (11:01 IST)

फळाच्या राजावर कोरोनामुळे संक्रांत

फळांचा राजा म्हणून ओळखणार्‍या आंबवर यंदा कोरोनाने संक्रांत आणली आहे. दरवर्षी गुढीपाडव्यानंतर बाजारात दिसणारा हा ‘राजा' (आंबा) कोरोनामुळे दिसेनासा झाला आहे. उत्पादक ते ग्राहक ही साखळी तुटल्याने आंबा उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार सतिीच आवारात दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत होती; परंतु यंदा आंबा बाजारात दाखल होण्यापूर्वीच कोरोना व्हारसची चर्चा सुरू झाली. त्यानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केली. संचारबंदी जाहीर करताना अत्यावश्यक सेवेअंतर्गत फळे व भाजीपालला नागरिकांना बाजारात जाऊन खरेदी, विक्री करण्याची सूट देण्यात आली; परंतु आंबा उत्पादक शेतकर्‍यांपासून ग्राहकांपर्यंत माल पोहोच होण्यामध्ये असंख्य अडचणी येत आहेत. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्याला मोठी  मागणी असते. हा हापूस आंबा कोकणातून मुंबई बाजारपेठात दाखल होतो. त्यानंतर देशभरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतो. त्यामध्ये केसर, देवगड, तोतापुरी जातीच्या आंब्यांना मागणी असते. कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून हा आंबा बाजारात येतो.
कोरोनामुळे जागोजागी होणारी नाकाबंदी, मजुरांची टंचाई, पॅकिंग साहित्याची कमतरता आणि मुळात मागणीच कमी असल्याने आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोलापूर बाजार समितीत केवळ आठ ते दहा  बॉक्स आंबा दाखल होत असल्याचे येथील व्यापारी मर्चंट यांनी सांगितल.