सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2020 (22:26 IST)

सिव्हिल इंजिनीअरला जितेंद्र आव्हाड यांच्या खासगी बंगल्यावर बेदम मारहाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाइट बंद करून दिवे लावण्याच्या आवाहनावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत एक तरुणाने त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या खासगी बंगल्यावर नेवून तरुणासोब त्यांच्यासमोर बेदम मारहाण केल्याचा आरोप या सिव्हिल इंजिनीअर तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही करण्यात आली आहे.
 
आता हे प्रकरण तापले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.