शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:34 IST)

गिरणी कामगारांना एकत्रितरित्या घरे देण्याचा प्रयत्न -जितेंद्र आव्हाड

मुंबईतील गिरणी कामगारांना 'नाविकास' क्षेत्रात एकत्रितरित्या घरे देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने म्हाडा आणि महसूल विभागाने पाहणी करून येत्या पंधरा दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले. मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांबाबत  झालेल्या बैठकीत आव्हाड बोलत होते. त्यांनी म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसनाच्या काही रखडलेल्या योजनांचाही आढावा घेतला व योजना गतीने पूर्ण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
 
मुंबईतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचे काम रखडल्याने स्थलांतरासंदर्भातील प्रश्नावरील उपाय योजना व बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या मागण्यांच्या अनुषंगानेही आव्हाड बैठक घेतली. बीडीडी चाळीतील रहिवाशांची पात्रता-अपात्रता निश्चित करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून ‘बीडीडी सेल’ स्थापन केला जाईल, असे आव्हाड यांनी सांगितले. रहिवाशांच्या पात्रतेचे निकष ठरविण्यात यावेत आणि हीप्रक्रिया सुलभ करावी, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.