1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. The State Election Commission has announced the dates for the municipal elections

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. राज्य निवडणूक आयोग मुंबईत पत्रकार परिषद घेत आहे. 
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली असून 39 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 29 महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रचार 48 तासांपूर्वी थांबवावा लागणार आहे. तर उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल प्रक्रिया 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत सुरु असणार आहे. 
31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 2 जानेवारी आहे. तर निवडणूक चिन्हांचे वापर 3 जानेवारी रोजी केले जाणार आहे. 
मतदान प्रक्रिया 15 जानेवारी रोजी होणार असून मतमोजणी लगेचच 16 जानेवारी रोही होणार आहे. 
या निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग येणार. निवडणुकांसाठी प्रमुख पक्ष तयारीला लागले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
वर्ष 2025 मध्ये या स्पर्धांमुळे गुगलवर सर्वाधिक क्रिकेट शोधले गेले