सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला विलंब करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असून, निकाल 21डिसेंबरलाच लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत, या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली.
2 डिसेंबर रोजी निवडणुका पार पडल्या असून 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार मात्र काही ठिकाणी न्यायालयीन प्रकाराने प्रलंबित असल्याने मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात शुक्रवारी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या निर्णय कायम ठेवला.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडुकाला राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवरी 2026 पूर्वी पूर्ण घेण्याचे आदेश दिले. तसेच निवडणुका पुढे जरी धाकल्या आहे तरीही मतमोजणी निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार.
असे सांगितले आहे. तसेच नागपूर खंडपीठाने मतमोजणीची तारीख बदल्यात हस्तक्षेप करू नये.असे नमूद केले आहे.
Edited By - Priya Dixit