मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (13:14 IST)

चष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...

चष्म्यावर स्क्रॅच पडल्यास नवीन चष्मा खरेदी करण्याची गरज नाही, या सोप्या टिप्स ने स्क्रॅच काढू शकता. जाणून घेऊ या काय आहेत त्या टिप्स ...
 
आपण आपल्या चष्म्याला कितीपण सांभाळून ठेवा, पण तरीही त्यावर स्क्रॅच येतातच. या स्क्रॅचमुळे आपण नवीन चष्मा विकत घेण्याचा विचार करीत असल्यास, तर थोडं थांबा. आम्ही आपणास अश्या काही टिप्स सांगत आहोत ज्यांचा प्रयत्नाने आपण चष्म्यावरून स्क्रॅच काढू शकता.
 
चला तर मग जाणून घेऊ या चष्म्यावरील स्क्रॅच काढून त्याला नवीन कसं बनवावं -
 
1 घरात ठेवलेले टूथपेस्ट घ्या, एका कपड्यावर थोडंसं टूथपेस्ट लावून चष्म्यावर स्क्रॅच आणि डाग असलेल्या जागेवर हळुवारपणे चोळा. काही वेळेनंतर आपल्याला डाग पुसट झालेले दिसणार.
 
2 थोडंसं बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा आता हे स्क्रॅच असलेल्या जागी लावा.
 
3 कारच्या काचा स्वच्छ करण्यासाठी ज्या विंडशीट वॉटर रिप्लेन्टचे वापर केलं जातं, याचा वापर करून देखील आपण चष्म्याचे स्क्रॅच स्वच्छ करू शकता.
 
4 कधी कधी रेफ्रिजरेटर मध्ये देखील आपल्या चष्म्याला ठेवा. असे केल्याने चष्म्यावरील जमलेल्या बर्फ काढल्यावर स्क्रॅच देखील फिकट होतील.