मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: रविवार, 8 मार्च 2020 (12:58 IST)

होळी खेळण्यासाठी रंगाची निवड कशी करावी, हानिकारक रंगांपासून बचाव करण्यासाठी काही टिप्स

होळी म्हणजे रंगाचा सण. होळीत सगळेच धुडगूस घालतात. रंगांचा हा सण सर्वांनाच आवडतो. मुले तर ह्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. होळीमध्ये रंगांची निवड करताना काही चुका होतात. त्यामुळे त्वचा आणि केस खराब होते. शरीराची कातडी खराब होते आणि त्वचे संबंधित रोग होतात. त्याच बरोबर डोळ्यांची जळजळ होते. कधी कधी तर बरेच दिवस शरीरावर रंग साचून राहतो. त्यासाठीची काही सावधगिरी बाळगावी लागेल आणि विशेष म्हणजे मुलांची काळजी घ्यावी लागणार. 
 
होळी खेळण्यासाठी रंग कसा निवडावा? 
होळी तर खेळायला आवडते पण रंगाची निवड कशी करावी त्यासाठी काही असे रंग पण बाजारपेठेत उपलब्ध असतात ज्यांचा शरीरावर काहीही दुष्परिणाम होत नाही. चला मग जाणून घेऊ या..
 
1 नैसर्गिक रंग: नैसर्गिक रंगाची निवड करून आणि बाजारातले हानीप्रद रासायनिक रंगाचा वापर टाळून आपण त्वचेवर होणारे दुष्परिणाम टाळू शकतो. 
2 कोरडा रंग: नैसर्गिक रंगाच्या बरोबरच कोरडे रंग जसे अबीर, गुलाल, सारखे कोरडे रंग वापरायला हवे. हे रंग सहजरीत्या स्वच्छ केले जाते. पाण्याबरोबर पण ह्या रंगाचा वापर केल्यास कोणते ही दुष्परिणाम होत नाही. 
3 फुलांचे रंग: पूर्वी होळीचे रंग पलाशच्या फुलांनी बनविले असायचे. त्याला गुलाल असे संबोधित केले जात असे. हे रंग नैसर्गिक असल्याने त्वचेसाठी चांगले असतात. ह्यात कुठलेही प्रकारांचे रसायने आढळत नाही. आजही काही ग्रामीण भागात अश्या प्रकाराच्या नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो.
 
हानिकारक रंगांचा वापर कसा टाळता येईल..?
1  सनग्लासेस वापरून : सर्वप्रथम डोळ्यांचे या हानिकारक रंगांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी या सनग्लासेस वापररून डोळ्यांना रंगापासून दूर ठेवण्यात मदत होईल.
2 नारळ तेल: होळी खेळाच्याआधी आपल्या संपूर्ण शरीरांवर आणि केसांना नारळाचे तेल लावल्यास त्वचेवर कोणताही रंग चिटकून बसणार नाही. शरीर तेलकट असल्याने लागलेला रंग सहज काढला येतो.
स्पंजने अंघोळ करावे : काही लोक रंग तर अती उत्साहात खेळून घेतात. पण रंग काढताना त्यांची दमछाक होते. त्यासाठी काही जण डिटर्जंटचा वापर करतात. त्या मुळे त्वचेस इजा होते. हे चुकीचे आहे. काही चांगले साबण वापरावे. जेणे करून त्वचेस हानी होणार नाही. सर्वप्रथम संपूर्ण शरीरांवर साबण भरपूर लावावे नंतर हलक्या हाताने स्पंजच्या तुकड्याने चोळावे. 
 
नैसर्गिक रंग असल्यास चटकन निघेल. रासायनिक रंग असल्यास रंग सुटायला उशीर लागेल. बळजबरीने रंग काढण्याचा प्रयत्न करू नये. काही काळानंतर रंग स्वतःच निघेल बळजबरीने काढल्यास त्वचेला नुकसान होईल.