सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (12:08 IST)

शाळांमधून सावरकरांचे फोटो काढाण्याचे राज्य सरकारचे आदेश

राजस्थान सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
राज्य सरकारने हे फोटो काढून टाकण्याचा आदेश देणारे एक पत्रक शाळांसाठी जारी केलं आहे. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल असे देखील म्हटले आहे.
 
भाजपने राजस्थान सरकारच्या या निर्णयावर विरोध दर्शवला आहे. सरकार महापुरुषांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप देखील केला आहे.
 
राजस्थानमधील भाजपाच्या नेत्यांनी या निर्णयावर टीका करत म्हटले की काँग्रेस सरकार केवळ एकाच कुटुंबातील व्यक्तींचे फोटो पाहू इच्छित आहे. मात्र भाजपा हे सहन करणार नाही.
 
राजस्थान सरकारने सरकारी शाळांमधील सावरकर, उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो काढून त्याऐवजी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर सरकारी शाळांमध्ये यांचे फोटो लावण्यात आले होते.