बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (10:43 IST)

Causes Of Dark Underarms : अंडरआर्म्स काळ्या होण्याची 5 कारणं जाणून घ्या..

अंडरआर्म्स काळेहोण्याची समस्या ही मोठी समस्या नसून, अत्यंत सामान्य आहे. आपणांस या काळपटपणापासून मुक्त होऊ इच्छित असल्यास या 5 कारणांवर नक्कीच विचार करावा, जे आपल्या अंडर आर्म्सच्या काळपटपणेसाठी जवाबदार आहेत.
 
1 हेअर रिमूव्हल क्रीम : होय, हेअर रिमूव्हल क्रीम अंडरआर्म्सला काळं करण्यासाठी जवाबदार असतं. जर आपण देखील केस काढण्यासाठी ही हेअर रिमूव्हल क्रीम वापरत असाल, तर हे वापरणे आजच थांबवा.
2 रेझरचा वापर : होय, रेझरचा वापर करणं देखील अंडरआर्म्स काळ्या होण्याला जवाबदार असतं. याचा वापर केल्याने केस राठ येतात, म्हणून केस काढण्यासाठी रेझरचा वापर करण्यापूर्वी नक्की विचार करावा.
3 डिओचा वापर : आपल्याला हे जाणून आश्चर्य होणार, परंतु काही रासायनिक असलेल्या डिओ किंवा अत्तराचा वापर केल्याने इथली त्वचा काळी पडते. जर आपण असे कोणतेही उत्पादन वापरत असल्यास ते वापरू नये किंवा वापरणं कमी करावं.
4 मृत त्वचा : मृत त्वचा नेहमी कळपटपण घेऊन असते, जे कालांतराने कडक आणि काळी होते. हे टाळण्यासाठी नियमाने त्वचेची स्वच्छता करणं आवश्यक आहे.
5 घाम : होय, घाम देखील त्वचेचे रंग गडद करण्यासाठी जवाबदार आहे. जर आपणांस जास्त घाम येत असल्यास, तर आपल्याला अंडरआर्म्स काळपट होण्याची समस्या उद्भवू शकते.