मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (10:12 IST)

आई नर्गिसनंतर संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग; उपचारासाठी अमेरिकेला जाणार

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याच्या उपचारासाठी संजय दत्त अमेरिकेला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. संजय दत्तला ३ स्टेजचा कर्करोग झाला आहे. फिल्म एनालिटिक्स कोमल नहाटा यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. आज दुपारीच संजय दत्त याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कामातून ब्रेक घेत असल्याचे सांगितले होते. याचे कारण आता चाहत्यांच्या समोर येत आहेत. तसेच शनिवारी संजय दत्तला श्वसनाचा त्रास होत असल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणीदेखील केली होती. ती निगेटिव्ह आली होती. तर काल, सोमवारी संजय दत्तला लीलावतीतून डिस्चार्ज देण्यात आला होता. 
1981 मध्ये संजय दत्तची आई आणि बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर होता. ज्यामुळे त्या बराच काळ हॉस्पिटलमध्ये होत्या.