बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : गुरूवार, 21 मे 2020 (17:11 IST)

विमान प्रवास करणार आहात मग वाचा 'ही' आहेत मार्गदर्शकतत्वे

येत्या सोमवारपासून मर्यादीत मार्गांवर देशांतर्गत विमान सेवा सुरु होणार आहे. त्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून गुरुवारी मार्गदर्शकतत्वे जारी करण्यात आली.

 
हवाई प्रवासासाठी हे नियम असतील
– विमान उड्डाणाच्या नियोजितवेळेच्या दोन तास आधी प्रवाशांना विमानतळावर पोहोचावे लागेल.
– प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्हज घालणे बंधनकारक असेल.
– पुढच्या चार तासांनी ज्यांचे विमान आहे, त्यांनाच फक्त टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश दिला जाईल.
– टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश देण्याआधी प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग चाचणी करण्यात येईल.
– १४ वर्ष वयोगटाच्या आतील मुलांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक नाही. ज्यांच्या अ‍ॅपवर हिरवं चिन्ह येणार नाही, त्यांना एअर पोर्टवर प्रवेश मिळणार नाही.
– शक्यतो ट्रॉलीचा वापर टाळण्याचा प्रयत्न असेल. पण विनंती केल्यास ट्रॉली उपलब्ध करुन दिली जाऊ शकते.
– टर्मिनलमध्ये प्रवेश करण्याआधी सामानाचे सॅनिटायझेशन केले जाईल.
– काऊंटरवरील स्टाफला फेस शिल्ड घालावे लागेल किंवा काच मध्ये आवश्यक आहे.
– सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांबद्दल सातत्याने घोषणा केल्या जातील.
– एअरपोर्ट स्टाफला पीपीई किट बंधनकारक आहे तसेच कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सॅनिटायझर ठेवावे लागेल.