रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 13 मे 2020 (16:06 IST)

एअर इंडिया १९ मे पासून स्पेशल देशांतर्गत विमान उड्डाणे करणार

अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी एअर इंडिया १९ मे पासून २ जूनपर्यंत स्पेशल देशांतर्गत विमान उड्डाणे सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही विमान उड्डाणे जास्तकरून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु येथून होणार आहेत.
 
चेन्नईसाठी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. हे विमान कोची-चेन्नईसाठी १९ तारखेला उड्डाण करणार आहे. दिल्लीसाठी १७३, मुंबईसाठी ४०, हैदराबादसाठी २५ आणि कोचीसाठी १२ विमान उड्डाणे होणार आहेत. दिल्लीहून विमान उड्डाणे जयपूर, बंगळुरु, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ आणि इतर दुसऱ्या शहरांसाठी असणार आहेत.
 
एअर इंडियाची मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद आणि विजयवाडा येथे विशेष उड्डाणे असणार आहेत. याशिवाय हैदराबादहून मुंबई आणि दिल्ली येथेही उड्डाणे होणार आहेत. बंगळुरुहून मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथेही उड्डाणे असतील. याशिवाय भुवनेश्वरचे विमानही बंगळुरुला येणार आहे.