मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2020 (12:27 IST)

एअर इंडियाचे पाच पायलट करोनाच्या जाळ्यात

‘वंदे भारत मिशन' अंतर्गत अनेक परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना देशात आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या मोहिेला मोठा धक्का  बसला. एअर इंडियाचे पाच पायलट करोनाग्रस्त आढळले आहेत. 'वंदे भारत मिशन' अंतर्गत एअर इंडियाच्या विमानांद्वारे परदेशी भारतीय देशात दाखल होत आहेत. याशिवाय, लॉकडाऊन दरम्यान देशातील वेगवेगळ्या भागांत अत्यावश्यक  सामान आणि औषधं पोहचवण्याचं काम एअर इंडियावर सोपवण्यात आलं. एअर इंडियाचे पायलटही करोनाच्या जाळ्यात अलगद अडकल्यानं चिंता व्यकत केली जाते. उड्डाण भरण्यापूर्वी 72 तास अगोदर झालेल्या करोना चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले.
 
हे सर्व पायलट मुंबईत आहेत आणि पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसोलेट करण्यात आलं. एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पायलट कार्गो विमान घेऊन काही दिवसांपूर्वी चीनला गेले होते. उल्लेखनीय म्हणजे, 'वंदे भारत मिशन' अंतर्गत गेल्या 24 तासांत 800 हून अधिक भारतीय मादेशात परतलेत. परदेशांत अडकलेल्या प्रवाशांना घेऊन 12 देशांमधून विमानं देशात दाखल होत आहेत. देशातील14 शहरांमध्ये 64 फ्लाईटस्‌ उतरणार आहेत. ही विमानं छोट्या- छोट्या विमानतळांवरदेखील उतरतील.
 
लोक आपापल्या घराजवळ पोहचतील, यासाठी ही काळजी घेण्यात येते. 'वंदे भारत मिशन' दरम्यान आखाती देशांतून 27 उड्डाणं, संयुक्त अरब अमिरातमधून 11, बांग्लादेशमधून 7, दक्षिण पूर्व आशियातून 14, अमेरिकेतून 7 उड्डाणं तसंच लंडनमधून 7 उड्डाणं घेत विमानं भारतासाठी रवाना होत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.