मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (07:58 IST)

अभिनेता संजय दत्तला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. श्वास घेताना त्रास होत असल्याने संजय दत्तला रविवार, ८ ऑगस्ट ला लीलावतीमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने अवघ्या दोनच दिवसांत संजय दत्त यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.

प्रसिद्ध छायाचित्रकार विराल भयानी यांनी संजय दत्तला डिस्चार्ज मिळाल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी संजय दत्तने ट्विट करत आजारी असल्याची माहिती दिली होती. त्याने म्हटले होते की, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रकृती ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे आणि माझा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांची मदत आणि शुश्रुषेमुळे मी एक-दोन दिवसांत घरी येईन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद, असे ट्वीट संजय दत्तने त्याच केले होते.