सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (10:34 IST)

Covid -19 : कोरोनापासून संरक्षणासाठी दररोज आपला बिछाना स्वच्छ करा

कोरोना विषाणूची भीती आज संपूर्ण देशात व्यापलेली आहे. या विषाणूंपासून सुटका मिळविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर या संसर्गापासून सुटकारा मिळवण्यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. 
 
आपल्या घरात आपले शयनकक्ष अशी जागा आहे, जेथे आपण आपला बराच काळ घालवतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण आपला जास्त काळ घरातच घालवत आहोत, अश्या परिस्थितीत स्वच्छतेची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि घराच्या कान्याकोपर्‍यात स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. दमल्यावर आपण सर्वात आधी आपलं पलंग गाठतो, अश्या परिस्थिती त्याची स्वच्छतेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घ्या काही अश्या 6 सोप्या टिप्स ज्या अमलात आणून आपण आपला पलंग दररोज स्वच्छ करू शकता-
 
1 दररोज सकाळी उठल्यावर आपल्या पलंगावरची चादर चांगल्या प्रकारे झटकून स्वच्छ करावी आणि एखादी स्वच्छ चादर पलंगावर अंथरावी.
2 आपल्या पलंगाला शक्य असल्यास आठवड्यातून किमान 2 दिवस ऊन दाखवावे जेणे करून त्या पलंगा मधील असलेले जिवाणूंचा उन्हात नायनाट होईल. 
3 दर 2 दिवसानंतर आपल्या पलंगा वरची चादर आणि उशीच्या खोळी बदलून टाकाव्या.
4 आपल्या झोपेच्या ठिकाणी कार्पेट असल्यास त्याची नियमाने स्वच्छता करावी त्यावर धूळ साठू देऊ नये किंवा शक्य असल्यास कार्पेट तिथून काढून घ्या.
5 पलंगाच्या जवळ पायपुसणे ठेवावं जेणे करून पलंगावर जाण्याच्या पूर्वी आपण आपले पाय चांगल्या प्रकारे स्वच्छ करून मगच पलंगावर जावे.
6 पलंगाच्या गादीवर साठलेली धूळ दर दोन दिवसांनी स्वच्छ करावी.