1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (09:47 IST)

Eye Care : सतत स्क्रीन बघून दृष्टीवर प्रभाव पडत असेल तर हे उपाय करून बघा

हल्ली स्क्रीन टाइमिंग वाढल्यामुळे डोळ्यांवर प्रभाव पडत असून डोळे जळजळणे, दुखणे, डोळ्यातून पाणी येणे असे प्रकार बघायला मिळत आहे. यासाठी काही सोपे उपाय करुन डोळ्यांची काळजी घेता येईल-
 
* डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे प्रत्येक 20 मिनिटांनी किमान 20 सेकंदासाठी डोळे बंद करावे. याने डोळ्यांना आराम मिळतो.
 
* सतत स्क्रीनवर टक लावून बघू नये. आपण काम करता पापण्या बंद करण्याची आवृत्ती कमी होते जे योग्य नाही. स्क्रीन वर बघताना देखील सतत पापण्या बंद करण्याची सवय लावावी.
 
* नजर कमजोर असल्यास नियमित रूपाने डोळ्याचा व्यायाम करा. डोळ्यांची पुतळी उजवी ते डावी आणि वरून खाली कडे फिरवा.
 
* आपला अंगठा भुवयांच्या मधोमध ठेवून काही काळ डोळ्यांना त्या बिंदूवर केद्रिंत करा. या व्यतिरिक्त आपण भीतींवर एखाद्या बिंदूवरही लक्ष केंद्रित करू शकता. हळू-हळू याची प्रॅक्टिस वेळ वाढवा.
 
* दिव्याचा ज्योतीला एकटक बघत राहण्याच्या प्रक्रियेला त्राटक असं म्हणतात. याने दृष्टीत सुधार होतो आणि एकाग्रताही वाढते.
 
* गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. नियमित याचे सेवन केल्याने आपल्या फरक जाणवेल.
 
* डोळ्यांचे स्नायू स्वस्थ ठेवण्यासाठी डोळ्यांची मसाज आवश्यक आहे. विटामिन इ युक्त तेल किंवा क्रीमने दररोज डोळ्यांची मसाज करा. यासाठी कोरफडही वापरू शकता.
 
* अंघोळ करताना डोळ्यांना कोमट पाण्याने स्वच्छ करा. थोड्या-थोड्या दिवसाने डोळ्यात गुलाब पाणी घाला.
 
* झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढून ठेवून द्यावे. झोपण्याच्या 2 तासाआधी पासून कॉम्प्युटरवर काम करणे थांबवावे.
 
* सकाळी बागेत हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चाला.