गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (13:07 IST)

डिजीटल आय स्ट्रेन म्हणजे काय, जाणून घ्या लक्षणं आणि उपचार

जी लोक दररोज लॅपटॉप, कॉम्‍प्युटर, मोबाइलला कमीत कमी 2 तासांपेक्षा जास्त हाताळत आहे अश्या लोकांना अती कामामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडतो आणि डोळ्यांची दृष्टी क्षीण होते. ह्याच बरोबर अजून दुसऱ्या प्रकारचे त्रासपण उद्भवू लागतात. अशापैकी एक त्रास आहे 'डिजीटल आय स्ट्रेन'. या त्रासांचे लक्षण आणि उपचार जाणून घेऊ या..
 
लक्षणं - 
अंधुक दृष्टी, डोळ्यांवर सूज येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे. असे लक्षणं दिसून येतात. त्या शिवाय मान आणि खांद्यामध्ये वेदना पण जाणवते. 
 
प्रतिबंध आणि उपचार - 
या सर्व उपकरणांपासून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होतो. काम करताना अंधार नसावे. भरपूर उजेड असावं. आजच्या काळात असे काही चष्मे येतात जे तीक्ष्ण प्रकाशाची तीव्रतेला कमी करण्याचे काम करतात. अश्या चष्म्याचा वापर करावा. डोळे आणि उपकरणांच्या दरम्यान किमान एका फुटाचे अंतर असायला हवे. जेथे काम करत आहोत तेथे प्रकाशाची संरचना व्यवस्थित आणि डोळ्यांच्या अनुरूप असावी. अश्या स्थळी LED लाइट्सचा वापर करावं. 
 
कॉम्‍प्युटर वर काम करताना टेबलं लॅम्पचा वापर करावा. असे केल्यास कॉम्प्युटरच्या मॉनिटरचा प्रकाश मंदावतो आणि डोळ्याला त्रास होत नाही. लॅपटॉपवर काम करताना त्याचा स्क्रीनवर स्क्रीनगार्ड लावून घ्यावे. जेणे करून आपल्या डोळ्यांना काही इजा होणार नाही. आपण सोशल ऍक्टिव्हिटीचे जास्त वापर करणे टाळावे. जेणे करून आपल्या डोळ्याला त्रास होणार नाही. झोपण्याचा अर्ध्या तासांच्या आधी सर्व डिजीटल उपकरणे बंद करून ठेवावी. आपल्या मोबाईल फोनला रात्री आपल्या पासून लांबच ठेवावे. 
 
डोळ्या संबंधित काहीही त्रास नसल्यास वर्षातून एकदा तरी आपल्या डोळ्यांची तपासणी अवश्य करून घ्यावे.