मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (10:45 IST)

घरीच तयार करा Face Primer, सोपी पद्धत जाणून घ्या

जेव्हा जेव्हा मेकअप बद्दल बोललं जातं तर सर्वात आधी नाव येतं प्रायमरच, कारण प्रायमर आपल्या त्वचेवर मेकअपला सेट करण्यासाठी मदत करतं. कोणतेही मेकअप उत्पादन वापरण्यापूर्वी प्रायमर लावण्याचा सल्ला दिला जातो, कारण मेकअपमध्ये प्रायमरची जागा खूप महत्त्वाची असते. 
 
प्रायमरच्या मदतीने मेकअप बेसला गुळगुळीत करू शकतो, त्याचा बरोबर दीर्घकाळ मेकअप टिकून राहण्यासाठी प्रायमर आवश्यक आहे. 
 
परंतु जर आपल्याला बाजारपेठांतील प्रायमर सूट होतं नसल्यास आणि आपल्या त्वचेला या पासून काही त्रास होतं असल्यास आपण बाजारपेठेतून आणण्यापेक्षा घरात तयार केलेले प्रायमर वापरू शकता. 
 
आता आपल्या मनात हा प्रश्न उद्भवत असणार की आपण घरात कसं काय प्रायमर तयार करू शकता. तर यांची काळजी आपण अजिबात करू नये. आम्ही आपल्यासाठी खास घेऊन आलो आहोत घरात प्रायमर बनविण्याचा काही खास टिप्स -
 
या लेखात आपण जाणून घेऊया की घरात आपण प्रायमर कसं काय तयार करू शकतो. तर चला मग नैसर्गिक प्रायमर बद्दल जाणून घेऊया. 
 
कोरफड एक नैसर्गिक प्रायमरचे काम करतं. आपण कोरफडीची जेल मेकअप करण्याचा पूर्वी आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावावी. या नंतर मेकअप सुरू करा. आपणास तर हे माहितीच आहे की कोरफड जेल त्वचेसाठी किती फायदेशीर आहे. हे आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते. 
 
कोरफड जेल आणि आपल्या मॉइश्चरायझरला समप्रमाणात मिसळून आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी लावून घ्या. हे देखील एक उत्तम प्रायमर आहे.  कोरफड जेल आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब आणि थोडं फाउंडेशन या तिन्हींना चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि घट्ट पेस्ट बनवा. तयार आहे आपले घरगुती प्रायमर.