शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जुलै 2020 (15:44 IST)

Skin Care Tips : ब्लीच करण्यापूर्वी जाऊन घ्या या 9 खास गोष्टी ....

सामान्यतः बायका आणि मुली आपली त्वचा उजळविण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन ब्लीच करवतात किंवा बऱ्याचवेळा घरीच ब्लीच करतात. जर आपण स्वतःहून घरातच ब्लीच करत असाल तर या 9 गोष्टी आपणास जाणून घेणे आवश्यक आहे-
 
1 चेहऱ्याला स्वच्छ आणि तजेल बनविण्यासाठी ब्लीच एक चांगला पर्याय आहे ब्लीच आपले अवांछित केस लपविण्यासह त्वचेमध्ये सोनेरी चमक आणते.
2 ब्लीचचा वापर हात, पाय, पोटावर वेक्सचा पर्याय म्हणून केला जाऊ शकतो.
3 लक्षात ठेवा की ब्लीचमध्ये अमोनियाचे प्रमाण दिलेल्या सूचनांनुसारच घाला. अमोनियाचे जास्त प्रमाण आपल्या चेहऱ्याला इजा करू शकतात.
4 याचा वापर करताना हे लक्षात असू द्या की हे डोळ्यांचा वर लागायला नको नाहीतर हे आपल्यासाठी हानिकारक असू शकतो. चांगले हेच राहील की हे डोळ्यांवर किंवा भुवयांवर लावू नये.
5 सध्या बाजारपेठेत ब्लीच बऱ्याच प्रकारांच्या कंपन्यांचे मिळतात, यांचा ट्रायल पॅकचा वापर आपण आपल्या त्वचेवर वापरू शकता.
6 डब्यावर दिलेल्या सूचनांनुसारच ब्लीच मध्ये अमोनिया पावडरचे प्रमाण घालावं.
7 क्रीम आणि पावडरच्या मिश्रणाला आधी हाताच्या कोपऱ्याला किंवा इतर जागी लावून बघा.
8 त्वचेवर जळजळ होत असल्यास मिश्रणात क्रीमाचे प्रमाण वाढवावं.
9 नेहमीच चांगल्या ब्रँडेड कंपनीचे ब्लीच वापरावं.