गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (17:08 IST)

पाकिस्तानकडून गोळीबार, कोल्हापूरचा जवान संग्राम शिवाजी पाटील शहीद

काही दिवसांपासून पाककडून सीमेवर कुरापती सुरू आहेत. भारतीय लष्कराकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिलं जात असून, शनिवारी सकाळी पाक लष्कराने पुन्हा एकदा शस्त्रसंधी धुडकावून लावत अंदाधुंद गोळीबार केला. राजौरी जिल्ह्यातील नोशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम  शिवाजी पाटील (वय ३५) शहीद झाले.
 
शहीद जवान संग्राम पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा गावातील रहिवाशी असून, अठरा वर्षांपूर्वी ते लष्करात दाखल झाले होते. सैन्यदलातील ‘१६ मराठा बटालियन’मध्ये ते कार्यरत होते. संग्राम यांची १७ वर्ष सेवेची मुदत गेल्या वर्षी संपली होती. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मुदत वाढवून घेतली होती.