सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (18:49 IST)

मनसेची 'कराची स्वीट्स' दुकानाच्या व्यवस्थापनाला कायदेशीर नोटीस

मुंबईत ‘कराची स्वीट्स’ नावांचं दुकान असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी कराची स्वीट्स दुकानाच्या व्यवस्थापनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पाकिस्तानातील शहर कराची या नावावर असलेल्या कराची स्वीट्स या नावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
 
याबाबत मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी दुकान व्यवस्थापनाला एक पत्र पाठवलं आहे. तसंच संबंधित आस्थापनाला न्यायालयात खेचण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
देशातील पारंपारिक शत्रू पाकिस्तानातील कराची या नावाचा आधार घेत आपण बहुचर्चित आस्थापन सुरू केलं आहे. त्याचा प्रचार व विस्तार करून भारतीयांचा भावनांना ठेच पोहोचवून व्यवसाय करत आहात. तसंच मराठी भाषेचाही द्वेश करत आहात त्याबाबत आक्षेप आहे, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.